मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं दंगल चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. ‘दंगल’नं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे.
आमीरच्याच ‘पीके’ सिनेमाला मागे टाकत हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ची एकूण कमाई 340.8 कोटी रुपये इतकी आहे.
मात्र दंगल सिनेमानं 345.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवत अवघ्या 17 दिवसात हा विक्रम मोडला आहे. दंगलने तिसऱ्या वीकेंडला 31.79 रुपयांची कमाई केली आहे.
एवढचं काय तर दंगलने सतराव्या दिवशीही १४.३३ कोटींची कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केलाय. दंगलला मिळालेल्या यशाने आमीर खुश असून त्याने चाहत्यांचे आणि दंगलच्या पूर्ण टीमचे आभार मानले आहेत.