मुंबई : मिस्टर परफेक्ट अभिनेता आमीर खानच्या, आमीर खान प्रोडक्शनसाठी नवा चेहरा हवा आहे, त्यासाठी त्याने ट्विटरद्वारे आवाहन केलं आहे.
गाणे म्हणता येणारी १२ ते १७ वयोगटातील मुलगी हवी असल्याचे त्याने ट्विटरद्वारे म्हटले आहे आहे. तसेच इच्छुकांनी आपल्या आवडीचे हिंदी गीत गाताना शुट करून ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पात्रतेत बसणाऱ्या आणि चित्रपट क्षेत्रात नव्याने पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक नवी संधी ठरणार आहे.
गाण्याचा व्हिडीओ शूट करण्याआधी आपली थोडक्यात ओळख गायकाला त्यात द्यावी लागणार आहे. नव्या चेहऱ्याच्या शोधासाठी प्रत्यक्ष स्क्रिनिंगच्या पारंपारिक पद्धतीला फाटा देत याकामी ट्विटरची मदत घेतली आहे. आपल्या ट्विटर खात्यावरून इच्छुकांना त्याने खुले आवाहन केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.