मुंबई : आमिर खान आणि अनुष्का शर्माची भूमिका असलेला 'पीके' चित्रपटाने वीकेंडला ९५.२१ कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपटांच्या निर्मार्त्यांनी दिली आहे.
'पीके'ने रविवारी ३८ कोटी रुपये कमाविले शनिवारच्या तुलनेत हे ३० टक्के अधिक होते. त्यामुळे एकूण कलेक्शन ९५.२१ कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी २६.६३ कोटी शनिवारी ३०.३४ आणि रविवारी ३८.२४ कोटींचे कलेक्शन जमा झाल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
चांगली काहणी आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांची सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आहे.
विधू विनोद चोपडा, हिरानी आणि यूटीव्हीने हा चित्रपट काढला आहे. चित्रपटात संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत यांची महत्त्वाच्या भूमिका आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.