अजय-अतुल यांचा लहानपणीचा फोटो होतोय व्हायरल

आपल्या संगीताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे गीतकार अजय-अतुल. सैराटमधील त्यांची प्रत्येक गाणी सुपरहिट झालीत. सध्या प्रत्येकाच्या तोंडी केवळ सैराटचीच गाणी ऐकायला मिळत आहेत. 

Updated: May 13, 2016, 11:10 AM IST
अजय-अतुल यांचा लहानपणीचा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : आपल्या संगीताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे गीतकार अजय-अतुल. सैराटमधील त्यांची प्रत्येक गाणी सुपरहिट झालीत. सध्या प्रत्येकाच्या तोंडी केवळ सैराटचीच गाणी ऐकायला मिळत आहेत. 

त्यांनी संगीतबद्ध तसेच गायलेल्या झिंगाट या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: झिंगायला लावलेय. केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर बॉलीवूडमध्येही त्यांनी आपला वेगळे स्थान निर्माण केलेय.

अजय-अतुल यांच्या लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत शिरूर येथील बाळासाहेबांच्या सभेत पोवाडा गाताना चिमुकले अजय-अतुल दिसत आहेत.