'बाहुबली 2 : द कन्क्ल्यूजन'चा नवा रेकॉर्ड

कटप्पाने बाहुबलीला का मारलं...हा एकच प्रश्न जणू अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला आणि फिल्मी चाहत्यांना सतावत होता. बाहुबली प्रदर्शित झाल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत फिल्मी वर्तुळात कटप्पाने बाहुबलीला का मारलं हाच सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता.

Updated: Apr 26, 2017, 07:15 PM IST
'बाहुबली 2 : द कन्क्ल्यूजन'चा नवा रेकॉर्ड title=

मुंबई : कटप्पाने बाहुबलीला का मारलं...हा एकच प्रश्न जणू अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला आणि फिल्मी चाहत्यांना सतावत होता. बाहुबली प्रदर्शित झाल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत फिल्मी वर्तुळात कटप्पाने बाहुबलीला का मारलं हाच सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता.

आता या प्रश्नाचा उलगडा शुक्रवारी होणार आहे..कारण बाहुबली द कन्क्ल्यूजन हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होतोयं...सिनेमाच्या निर्मात्यांनीही सिनेमाच्या प्रदर्शनाची जय्यत तयारी केली असून तब्बल 9000 स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित होतोयं.

भारतात एवढ्या मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणारा बाहुबली हा पहिला सिनेमा ठरणार आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींगही सुरु झालं असून साऊथमध्ये तर 2 मे पर्यंतचे शो हाऊसफुल झाले आहेत. आतापर्यंत तब्बल 55 टक्के या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींग झालं आहे. त्यामुळे साहजिकचं बाहुबलीच्या दुस-या भागाकडून सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.