रणवीर-वाणीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीचा 'बेफ्रिके'

सिनेरसिकांसाठी या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आदित्य चोप्राचं दिग्दर्शन असलेला 'बेफ्रिके' हा एकमेव हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाये. 

Updated: Dec 9, 2016, 08:25 AM IST
रणवीर-वाणीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीचा 'बेफ्रिके' title=

मुंबई : सिनेरसिकांसाठी या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आदित्य चोप्राचं दिग्दर्शन असलेला 'बेफ्रिके' हा एकमेव हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाये. 

सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या सिझलिंग केमिस्ट्रीची सध्या जबरदस्त चर्चा होतेयं. त्यामुळे या दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्रीचा या सिनेमाला फायदा होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेय. 

या सिनेमाव्दारे आदित्य चोप्रा 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळलायं. त्यामुळे आदित्यच्या इतर सिनेमांप्रमाणे हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केलाय. 

या सिनेमाबरोबर मराठीत 'नागपूर अधिवेशन' हा दोन वर्षांपासून रखडलेला एकमेव सिनेमा प्रदर्शित होणार आहे.