आर्चीच्या आईने सैराटआधी फँड्रीतही केले होते काम

मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या सैराटमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले. सैराटमधील प्रत्येक कलाकाराच अभिनय नैसर्गिक असाच होता.

Updated: Jun 24, 2016, 09:31 AM IST
आर्चीच्या आईने सैराटआधी फँड्रीतही केले होते काम

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या सैराटमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले. सैराटमधील प्रत्येक कलाकाराच अभिनय नैसर्गिक असाच होता. आर्ची, परश्या, बाळ्या, सल्या, आनी या पात्रांनी तर लोकांच्या मनात घर केलेच मात्र त्याचबरोबर आर्चीच्या आईची भूमिकाही अभिनेत्री भक्ती चव्हाण यांनी सुंदर रेखाटली.

मूळच्या उस्मानाबाद येथील भक्ती चव्हाण या सध्या पुण्यात राहत आहेत. नागराज मंजुळे यांच्या सैराटच नव्हे तर याआधी फँड्रीतही त्यांनी काम केले होते. फँड्रीतही त्यांनी पाटलीणीची भूमिका केली होती. फँड्रीनंतर त्यांनी कोकणस्थ, हॅपी जर्नी, हेल्पलाईन, झाड, उणीव यांसारख्या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली. 

फँड्रीतील कामामुळे सैराटमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली असे त्या सांगतात. स्त्रीकुट्ट या नाटकाद्वारे त्यांनी अभिनयास सुरुवात केली.