बॉलिवूड प्रोड्यूसरचा इस्तांबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू

इस्तांबुलमधील रियान नाईट क्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 'रोर' मूवीचे प्रोड्यूसर अबीस रिजवी यांचा नाईट क्लबमध्ये फायरिंग दरम्यान मृत्यू झाला आहे.

Updated: Jan 2, 2017, 05:21 PM IST
बॉलिवूड प्रोड्यूसरचा इस्तांबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू title=

नवी दिल्ली : इस्तांबुलमधील रियान नाईट क्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 'रोर' मूवीचे प्रोड्यूसर अबीस रिजवी यांचा नाईट क्लबमध्ये फायरिंग दरम्यान मृत्यू झाला आहे.

अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर रिजवी यांचा मुलगा आहे. सुषमा स्वराजने रविवारी रात्री ट्विट करत याची माहिती दिली. गुजरातमधील खुशी शाहचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोघांच्या कुटुंबियांशी फोनवर बोलल्या.