मुंबई : आमिर खानचा दंगल बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. 'पीके'नंतर पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्टने आपली वेगळी छाप उमटवलीय. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात फिल्मने दणक्यात एन्ट्री केलीय.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान इस बॅक... 'पीके' या सिनेमानंतर तब्बल दोन वर्षांनी आमिरचा सिनेमा आज आपल्या भेटीला आलाय. आमिर खानचा बहुचर्चित दंगल आज प्रदर्शित झालाय. आमिरच्या चाहत्यांना दंगलची बरीच उत्सुकता लागली होती. हरियाणातील कुस्तीपटू महावीर फोगाट आणि त्यांच्या दोन मुली... गीता आणि बबिता... यांचा कुस्तीच्या आखाड्यातील संघर्ष आणि एकूणच त्यांच्या जीवनावर आधारित असलेला दंगल हा सिनेमा आहे.
देशभरात सुमारे 4 हजारहून अधिक स्क्रीन्सवर दंगल झळकला आहे... तर अमेरिका, युकेमध्येही दंगलची प्रेक्षकांना बरीच एक्साईटमेन्ट आहे. त्यामुळे परदेशातही सुमारे एक हजार स्क्रीन्सवर दंगल प्रदर्शित होणारे. गेल्या काही दिवसांपासून आमिरने फिल्मसाठी हटके प्रमोशन फंडा राबवलेला आहे. आमिरच्या दंगलशिवाय बॉक्स ऑफिसवर या शुक्रवारी इतर दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे आमिरच्या फॅन्समध्येही सिनेमाबद्दल जबरदस्त क्रेझ बघायला मिळतेय.
आमीर आणि क्रिस्टमसचं एक जुनं नातं आहे, त्याचे '3 इडियट्स', 'तारे जमीन पर', 'गजनी', 'धूम 3', 'पीके' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे क्रिसमसलाच प्रदर्शित झालेत. २०१४ साली आलेल्या आमीरच्या 'पीके' या सिनेमानं आत्तापर्यंत जगभरात तब्बल ७९० कोटींची कमाई केलीय. बॉलिवुडचा किंग खान शाहरुख असो किंवा सलमान, पीके या सिनेमाचा रेकॉर्ड अजून कुणीही मोडू शकलेला नाही. आता स्वत: आमिरंच आपल्या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबीता फोगट यांच्यावर आधारित दंगल हा एक बायोपिक सिनेमा आहे. दिग्दर्शक नितोश तिवारी यांनी सिनेमाला छान ट्रीटमेन्ट दिली आहे, विशेष करुन सिनेमाचं कास्टींग एकदम परफेक्ट बसलंय. छोट्या गीता फोगटच्या व्यक्तिरेखेत दिसणा-या अभिनेत्री झायमा वसीमनं तिची भुमिका चोख पार पाडली आहे. राहिला प्रश्न आमीर खानचा तर उगीचच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जात नाही. या सिनेमात आमीरचे दोन शेड्स पहायला मिळतात. या दोन्ही करॅक्टरसाठी त्यानं जीव तोडून मेहनत केलीये, वडिल मुलीचं सुंदर रिलेशन दिगदर्शक नितेश तिवारीनं यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.
केवळ एक कमर्शियल मसाला सिनेमा न बनवता दंगलला रिएलिस्टीक टच देण्याचा आमीरचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच भावून जातोय.