मुंबई : हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान याला आता सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. कारण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात दाद मागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात, सलमान खानला निर्दोष ठरवले आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात, राज्य सरकार जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.
हिट अँड रन प्रकरणी सलमान खान याच्याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सांगितले.