पाहा काय आहे 'बजरंगी भाईजान' आणि बाहुबलीमधील खास कनेक्शन

सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते म्हणजे के. वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या दोन्ही चित्रपटांची कथा लिहिलंय. 

PTI | Updated: Jul 20, 2015, 06:58 PM IST
पाहा काय आहे 'बजरंगी भाईजान' आणि बाहुबलीमधील खास कनेक्शन  title=

नवी दिल्ली: सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते म्हणजे के. वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या दोन्ही चित्रपटांची कथा लिहिलंय. 

विजेंद्र प्रसाद, राजमौलीचे वडील आहेत आणि ते कबीर खानला बजरंगी भाईजानचं दिग्दर्शन सोपविण्याआधी अनेकांना भेटले होते. प्रसाद यांना अक्षय कुमार अभिनित 'राउडी राठोड'च्या कथेचं श्रेयही जातं. २००६मध्ये तेलुगू चित्रपट 'विक्रमादित्य'चा रिमेक राउडी राठोड होता. ज्याचं दिग्दर्शन राजमौलीनं केलं होतं.

'भाईजान'च्या एक आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या बाहुबलीनं बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा गल्ला जमवला असून तब्बल ९ रेकॉर्ड बनवलेय. बाहुबली आतापर्यंतची ३०० कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली दक्षिण भारतीय फिल्म बनलीय.

तर दुसरीकडे सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपटही बॉक्स ऑफिस गाजवतोय. त्यानं पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा टप्पा ओलांडलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.