नवी दिल्ली : अभिनेता इरफान खान सध्या त्याच्या आगामी मदारी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनचाच भाग म्हणून इरफाननं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींना ट्विट केलं.
देशाचा एक सामान्य नागरिक आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी भेटू शकतो का? असा प्रश्न इरफाननं या तिन्ही नेत्यांना विचारला. इरफानच्या या ट्विटला मग या तिन्ही नेत्यांनी रिप्लाय दिला. पहिल्यांदा इरफाननं केजरीवालांना ट्विट केलं. या ट्विटनंतर केजरीवालांनीही इरफानला मंगळवारी 12 वाजता भेटायला बोलावलं.
.@irrfan_k Sure
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 16, 2016
.@irrfan_k Tuesday 11 am, my office.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 16, 2016
यानंतर इरफाननं राहुल गांधींना ट्विट करून हाच प्रश्न विचारला. तुम्हाला भेटलो तर आनंद होईल, असा रिप्लाय राहुल गांधींनी दिला.
@irrfan_k Happy to meet.
Pl DM your number— Office of RG (@OfficeOfRG) July 16, 2016
Thank you @OfficeOfRG , I have responded.
— Irrfan Madaari (@irrfan_k) July 16, 2016
इरफानच्या या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयानंही उत्तर दिलं आहे. पंतप्रधान सध्या संसदेच्या अधिवेशनात व्यस्त आहेत. भेटण्यासाठीचं एक पत्र पाठवा, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयानं केलं.पंतप्रधानांच्या या ट्विटनंतर इरफाननं आपण पत्र पाठवत असल्याचं ट्विट केलं.
@irrfan_k Currently the PM is occupied with the upcoming Parliament Session. Please send a letter with details.
— PMO India (@PMOIndia) July 17, 2016
Dhanyawad. Please DM me the email id and I shall send across the letter. @PMOIndia
— Irrfan Madaari (@irrfan_k) July 17, 2016