मुंबई : करिश्मा का करिश्मा ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये रोबोटचं काम केलेली करिश्मा म्हणजेच झनक शुक्ला घराघरात पोहोचली. या मालिकेबरोबरच झनकनं 'कल हो ना हो'मध्ये प्रीती झिंटाच्या बहिणीची भूमिका केली होती.
सोनपरी, सीआयडी, हतीम यासारख्या मालिकेमध्येही तिनं काम केलं होतं. झनक आता 20 वर्षांची झाली आहे. झनकनं तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ही झनकच आहे का यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.