कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!

गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे. 

Updated: Mar 22, 2016, 01:53 PM IST
कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'! title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे. 

पती संजय कपूरपासून घटस्फोटाच्या मुद्यावर करिष्माचं कोर्टात भांडण सुरू आहे. परंतु, या दरम्यान अनेक वादात अडकलेल्या करिष्माकडे सध्या इतकेही पैस उरलेले नाहीत ज्यातून ती आपल्या मुलांच्या शाळेची फी-देखील भरू शकेल, असं एका वेबसाईटनं म्हटलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, करिष्मानं आपल्या पतीकडून चारशे रुपये मुलांच्या संगोपनासाठी मागितलेत. इतकंच नाही तर करिष्मानं आपल्या पती आणि सासूविरोधात हुंड्यासाठी छळाचा आरोपही दाखल केलाय. 

करिष्माचा बॉयफ्रेंड

दुसरीकडे करिष्माचा तथाकथित सद्य बॉयफ्रेंड आणि एका फार्मास्युटिकल कंपनीचा सीईओ संदीप तोश्नीवाल याच्याही अडचणींत भर पडतेय. संदीपची पत्नी आश्रिता घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास तयार नाही. 

मोठ्या पडद्यावर परतणार? 

त्यासाठी करिष्मा लवकरच मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांत करिष्माचे सिनेमे चाललेच नाहीत... आणि जी काही थोडी फार कमाई झाली त्याचे पैसे करिष्मानं खर्च करून टाकले. सुरुवातीला तर तिच्याच कमाईच्या पैशांतून तिचं घर सुरू होतं.