मुंबई : सोशल मीडियावर 'बाहुबली २' फिव्हर केवढा चढलाय... त्याचंच हे एक उदाहरण... एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसकडे सुट्टीचा अर्ज केलाय... तोही चक्क 'कट्टपानं बाहुबलीला का मारलं?' हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 'बाहुबली २' पाहायचाय, म्हणून सुट्टी हवी असल्याचं त्यानं आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलंय.
काही ऑफिसमध्ये तर खास बाहुबली २ पाहण्यासाठी सुट्टी घोषित करण्यात आल्याचं म्हटलं जातंय... यासाठी एक खास सुट्टीचा अर्जच तयार करण्यात आलाय. २८ तारखेलाच आपल्याला हा सिनेमा का पाहयचाय? याची कारणंही तुम्ही यात देऊ शकता... त्यासाठी काही पर्यायही दिले आहेत.
'बाहुबली २' तुम्हाला २८ तारखेलाच का बघायचाय याची कारणंही तुम्ही लिहू शकता. यासाठी काही पर्यायही या फॉर्ममध्ये दिले आहेत.
- कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर मिळवण्यासाठी
- बाहुबलीचा दुसरा भाग बघण्यासाठी ६५८ दिवसांची वाट पाहिली आणि आता मी अजून थांबू शकत नाही
- राणी देवसेनेला पाहायचंय
- इतर लोक बाहुबली बघण्याचा आनंद घेत असताना मला त्यापासून वंचित राहायचं नाही
- भल्लालदेववर विजय संपादन करताना प्रभासला मला पाहायचं आहे
या अर्जासोबत वरिष्ठांसाठी एक खास टीपही आहे. 'तुम्हीही हा सिनेमा पाहावा, असं मला वाटतं' असं यामध्ये म्हटलं गेलंय. 'बाहुबली- द कनक्ल्युजन' हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तुम्ही बॉस असाल आणि असेच अर्ज तुमच्या ऑफिसमध्ये आले तर फार आश्चर्य वाटून घेऊ नका...