सरकारने प्राईम टाइमची व्याख्या बदलली

Updated: Apr 9, 2015, 07:03 PM IST
सरकारने प्राईम टाइमची व्याख्या बदलली  title=

मुंबई : मराठी सिनेमांच्या मल्टिप्लेक्समधल्या प्राईम टाईमबद्दल सरकारनं शब्द फिरवलाय. मराठी निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्राईम टाईमला बंधनकारक करण्याची घोषणा परवाच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी केली होती. पण दोन दिवसांतच सरकारनं या निर्णयाबद्दल एक पाऊल मागे घेतलंय.

आता प्राईम टाईमची नवी व्याख्या 12 ते 9 अशी करत तावडेंनी नवा विनोद केलाय.... मल्टिप्लेक्स मालकांच्या भेटीनंतर मराठी सिनेमा 12 ते 9 या वेळात दाखवणं बंधनकारक करण्याचा हा निर्णय घेण्यात आालाय. 

या संदर्भात निर्माते आणि मल्टीप्लेक्स मालकांची बैठक जाली. या बैठकीत प्राइम टाइमची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मराठी चित्रपट १२ ते ९ या कालावधीत कधी दाखवायचा हा निर्णय मराठी चित्रपट निर्माते घेऊ शकणार आहे. पण यात वाद झाल्यास याचा निर्णय एका समन्वय समितीमार्फत करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

यापूर्वी प्राइम टाइम हा ६ ते ९ या कालवधीत होता. पण आता तो १२ ते ९ असा करण्यात आला आहे. मराठी चित्रपटाला तरूणवर्ग दुपारी १२ आणि ३ चा शोला पसंती देतात. या काळात व्यवसाय अधिक होतो. सहाचा शो जास्त चालत नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचे मराठी निर्माते महेश कोठरे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.