माझ्या मुलांनी मला खरं प्रेमाचा अर्थ शिकवला - शाहरूख खान

 शाहरूख खान स्क्रिनवर रोमान्सच्या बाबतीत बेस्ट आहे. पण स्क्रिनवर रोमान्सचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या मते त्याला प्रेमाचा खरा अर्थ त्याच्या मुलांनी शिकवला. 

Updated: Sep 23, 2015, 05:56 PM IST
माझ्या मुलांनी मला खरं प्रेमाचा अर्थ शिकवला - शाहरूख खान  title=

मुंबई :  शाहरूख खान स्क्रिनवर रोमान्सच्या बाबतीत बेस्ट आहे. पण स्क्रिनवर रोमान्सचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या मते त्याला प्रेमाचा खरा अर्थ त्याच्या मुलांनी शिकवला. 

 

४९ वर्षीय अभिनेता तीन मुलांचा बाप आहे. आर्यन १८, सुहाना १५ आणि दोन वर्षांचा अबराम... शाहरूख खान नेहमी आपल्या मुलांसोबतचे क्षण ट्विटरवर शेअर करत असतो. आताही त्याने सांगितले की माझे लव गुरू माझी मुलं आहेत. 

शाहरूख खान सध्या रोहीत शेट्टी याच्या 'दिलवाले' या चित्रपटात काम करीत आहे. अनेक वर्षांनंतर शाहरूख काजोलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.