सैराटची बॉक्स ऑफिसवर उंचच उंच भरारी

बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणा-या सैराट या सिनेमानं पुन्हा एकदा नवीन विक्रम  प्रस्थापित केलाय. सैराटनं आता पर्यंत 80कोटींचा गल्ला जमवलाय.

Updated: Jun 3, 2016, 07:25 PM IST
सैराटची बॉक्स ऑफिसवर उंचच उंच भरारी title=

मुंबई : बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणा-या सैराट या सिनेमानं पुन्हा एकदा नवीन विक्रम  प्रस्थापित केलाय. सैराटनं आता पर्यंत 80कोटींचा गल्ला जमवलाय.

सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय. नागराज मंजूळे दिग्दर्शित या सिनेमातील परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.

झिंगाट गाण्यावर तर अवघा महाराष्ट्र थिरकला होता. त्यामुळे आता इतर चित्रपट निर्मात्यांनाही सैराटची भुरळ पडली असून गुजराती आणि दक्षिणेकडेही आता सैराटची रिमेक बनणार आहे. 

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या सिनेमाने इतकी कमाई केली आहे. सैराटची घोडदौड पाहता सैराट आता शंभर कोटींची भरारी घेणार का याचीच आता सगळ्यांना उत्सुकता लागलीये.