लॉस अँजेलस : २०१५ साली कामोत्तेजक रोमँटिक सीन केल्याने अभिनेत्री डकोटा जॉनसन हिच्यासोबत पुरूष डेटिंग करायला घाबरतात असं तिने म्हटलं आहे. 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या चित्रपटात तिने कामोत्तेजक सीन दिला होता.
गेल्या वर्षी रॉक बँड 'ड्राउनर्स' चा प्रमुख गायक मॅट हिटसोबतचे संबंध तुटल्यानंतर जॉनसनने कोणाशीच संबंध ठेवलेले नाहीत. तिच्यापासून पुरुष लांब जात असल्याची चिंता तिला सतावते आहे. 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या चित्रपटातील कामोत्तेजक दृष्यासारखंच खासगी आयुष्यातही मी अशीच असेन असं लोक समजतात, परंतु हे खरे नाही.''
'मी एक अभिनेत्री आहे आणि मी अभिनयच करते. पण बऱ्याच कलाकारांसोबत असे घडते. लोकांना वाटते की जशी भूमिका करते तशीच ती खऱ्या आयुष्यातही असेल असंही पुढे डकोटाने म्हटलं आहे.
जॉनसन सध्या कामात व्यस्त आहे. एकटी असताना ती चित्रपट पाहते किंवा पुस्तकं वाचते. असं तिचं म्हणणं आहे
.