मुंबई : पूनम पांडे म्हटलं की तुम्हाला अनेकदा न्यूड पोस्टरमुळे चर्चेत आलेली पूनम पांडे आठवेल... तसंच आपल्या ‘बोल्ड अँन्ड न्यूड’ पोस्टरमुळे पुनम पांडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय... पण, इथं ट्विटर क्वीन पूनम पांडे नाही तर हा बॉलिवूडचा एक नवा चेहरा आहे...
‘ट्रिप टू भानगढ’ या सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या या नव्या अभिनेत्रीचं नावही पूनम पांडे आहे.
ट्विटर क्वीन पूनम पांडे हिला टक्कर देण्यासाठी आलेल्या या अभिनेत्रीनं आपल्या पहिल्याच पोस्टरननं खळबळ उडवून दिलीय. या पोस्टरवर ही नवी ज्युनिअर पुनम पांडे टॉपलेस दिसतेय. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच पूनम पांडे आपल्या नावामुळेच अधिक चर्चेत आहे.
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं (सिनिअर) नाव याआधी अनेकदा विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनमध्येही पोहचलंय.
पूनमचा (ज्युनिअर) हा सिनेमा हॉरर जॉनर आहे. जितेंद्र पवार यानं राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भानगढ या किल्ल्यात शूट केलाय. भानगढ हा किल्ला भूतांची जागा म्हणून प्रसिद्ध आहे.
सांगितलं जातंय की, शुटींग दरम्यान तर पूनमला भीती वाटली नाही पण आपल्या नावाच्याच ‘पूनम पांडे’ हिच्यामुळे झेलाव्या लागणाऱ्या अडचणींना मात्र ती भलतीच घाबरलीय.
येत्या 22 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमातून ही ज्युनिअर पूनम पांडे प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची कितपत दखल घ्यायला भाग पाडते, हे लवकरच कळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.