मुंबई : महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे. त्यांने मोदींना टॅग केल्याने हेच का अच्छे दिन असं म्हणण्याची वेळ आला आहे.
कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून ट्विट केले आहे. त्यातून त्याने मुंबई पालिकेतील कामासाठी पैसे मागितले जातात, अशी तक्रार केली आहे. आपण प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतो. मात्र तरीही आपल्याला कामं करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची अगतिकता त्यानं व्यक्त केली आहे.
I am paying 15 cr income tax from last 5 year n still i have to pay 5 lacs bribe to BMC office for making my office @narendramodi
— KAPIL (@KapilSharmaK9) September 9, 2016