मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रानं कारकिर्दीच्या सुरवातीला तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, असा दावा तिचा माजी पीए प्रकाश जाजूंनी केला होता. या प्रकरणी आता प्रियांका चोप्रानं मौन सोडलं आहे. प्रियांकानं हा दावा फेटाळून लावला आहे.
प्रकाश जाजू सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्याच्या वक्तव्याची शाहनिशा न करता माध्यमं अशा बातम्या कशा देऊ शकतात, असा सवालही तिनं उपस्थित केला आहे.
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं केलेल्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच प्रियांकाच्या माजी पीएनं केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती.