सलमान खान - गौतम गंभीर बनले नातेवाईक!

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा नातू आश्रय शर्मा - राधिका गंभीर हे दोघे सोमवारी विवाह बंधनात अडकलेत. यामुळे, आता अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर हे दोघं नातेवाईक बनलेत.

Updated: Dec 8, 2015, 11:40 AM IST
सलमान खान - गौतम गंभीर बनले नातेवाईक! title=

मंडी : माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा नातू आश्रय शर्मा - राधिका गंभीर हे दोघे सोमवारी विवाह बंधनात अडकलेत. यामुळे, आता अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर हे दोघं नातेवाईक बनलेत.

कारण, नववधू राधिका गंभीर ही क्रिकेटर गौतम गंभीर याची चुलत बहिण आहे.... तर आश्रय शर्मा हा आयुषचा मोठा भाऊ आहे. आयुष आणि सलमान खानची बहिण अर्पिता हे गेल्या वर्षी विवाह बंधनात अडकलेत. त्यामुळे, राधिका ही अर्पिताची जाऊबाई बनलीय. आश्रय हा ग्रामीण विकास मंत्री अनिल शर्मा यांचा मोठा मुलगा आहे.

आश्रय आणि राधिका यांच्या लग्नासाठी अनेक बडे नेते आणि अभिनेते उपस्थित होते. या लग्नासाठी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. तसंच खान कुटुंबातून सोहेल खानही या लग्नसाठी उपस्थित होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.