मुंबई : "आमचं जीवन उद्धवस्त झालंय, पण आम्ही सलमानला माफ केलंय" असं सलमानच्या गाडीखाली जीव गेलेल्या इसमाच्या मुलानं म्हटलंय, कदाचित गरीबाकडे माफ करण्यापेक्षा मोठं औदार्य नसावं, म्हणूनच त्यांनी मोठ्या मनानं सलमानला माफ केलं असावं.
सलमान खानच्या 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी सेशन कोर्टाने आपला निर्णय दिला आहे, मात्र यामुळे अपघातातील पीडित परिवाराला मोठा फरक पडलाय असं काहीही झालेलं नाही.
वडील अपघातात गेले शिक्षण सोडावं लागलं
२८ सप्टेंबर २००२ रोजी या अपघातात मृत्युमुखी पडलेले नुरूल्लाह महबूब शरीफ, यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फिरोज शेखला शिक्षण सोडावं लागलं, परिवाराला आधार देण्यासाठी काम शोधावं लागलं, व्यवस्थित काम नाही मिळालं, म्हणून गवंडी काम करावं लागतंय. फिरोजला आता दोन मुलं आहेत.
आमचं जीवन उद्धवस्त झालंय
एक अभिनेत्याचे आई-वडीलांसाठी हा एक कठीण काळ आहे, मी हे दु:ख समजू शकतो, मी सलमानला माफ केलंय, त्याने आमचं जीवन उद्धवस्त केलंय, असं फिरोजने म्हटलंय.
तरीही फिरोज म्हणतो, मला सलमान खानचा अभिनय आवडतो, त्याचे चित्रपट देखिल मी पाहतो., सलमानने हे ठरवून केलेलं नव्हतं, पण माझे वडिल या अपघाताचा शिकार झाले हे दुर्देवं आहे. फिरोजच्या आईला भांडीकुंडी धुण्याचं काम करावं लागलं.
फिरोजची आई सलमानबद्दल म्हणते
बेगम जहान म्हणते, माझ्या पतीच्या मित्राने मला सांगितलं की त्यांचा अपघातात मृत्यू झाला, तोपर्यंत मला माहित नव्हतं सलमान खान कोन आहे. नंतर लक्षात आलं की तो एक अभिनेता आहे.
सलमानचं मन खूप मोठं आहे, पण ....
घटनेला आठवडा उलटला असेल, तेव्हा मी त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला गेली होती, पण सिक्युरिटीने मला हाकलून लावलं होतं. लोक म्हणत होते, सलमानचं मन खूप मोठं आहे, पण कधी आमची विचारपूस केली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.