मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा 'ट्यूबलाइट'ची कथा ही एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचं म्हटलं जातंय. सिनेमामध्ये 1962 च्या इंडो-सिनो वॉरच्या देखील काही बॅकड्रॉप आहेत. 'ट्यूबलाइट'ची स्क्रिप्ट ही कॉपी असल्याच्या चर्चा आहे. हा सिनेमा 2015 मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय' सिनेमाचा रिमेक आहे.
दोन्ही सिनेमामध्ये फक्त एकच फरक आहे की 'लिटिल बॉय' मध्ये एका पित्याची आणि मुलाची कथा आहे तक 'ट्यूबलाईट'मध्ये दोन भावांची कथा आहे. 'लिटिल बॉय' हा एक फँटसी सिनेमा आहे. जो वर्ल्ड वॉर 2 वर आधारित आहे.
सिनेमात एका मुलाची कथा आहे. जो शाळेमध्ये त्याच्या कमी उंचीमुळे चिडवला जातो. वर्ल्ड वॉर 2 मध्ये जेव्हा त्याच्या पित्याला बंदी बनवलं जातं तेव्हा सगळ्या संकटांना तोंड देत तो त्याच्या पित्याला शोधण्यासाठी निघतो.
'ट्यूबलाईट'मध्ये सलमान हा एक विशेष भूमिका करणार आहे. ज्याला गोष्टी या नंतर समजतात. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.