'संजिवनी'फेम अभिनेता संजित बेदीचं निधन

छोट्या पडद्यावर अनेक भूमिकांमधून समोर दिसलेला अभिनेता संजित बेदी यानं अखेरचा श्वास घेतलाय. 'संजिवनी' या मालिकेत त्यानं 'डॉक्टर ओमी' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Updated: Jun 24, 2015, 01:36 PM IST
'संजिवनी'फेम अभिनेता संजित बेदीचं निधन title=

मुंबई : छोट्या पडद्यावर अनेक भूमिकांमधून समोर दिसलेला अभिनेता संजित बेदी यानं अखेरचा श्वास घेतलाय. 'संजिवनी' या मालिकेत त्यानं 'डॉक्टर ओमी' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

'ब्रेन वायरस'मुळे संजित गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तो कोमामध्ये गेला. 

संजिवनीशिवाय तो जाने क्या बात हुई, थोडी सी जमिन थोडा सा आसमान, क्या होगा निम्मो का, कसौटी जिंदगी की आणि आणखी काही बालाजी सिरियल्समध्ये दिसला होता. 

संजितच्या निधनानं अनेकांना धक्का बसलाय. संजितनं रेखा भाटिया हिच्याशी लग्न केलं होतं. संजितवर आज सकाळी अंत्यसंस्कार पार पडले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.