लवकरच दिसणार शाहिदच्या मीराची 'झलक'!

सध्या अभिनेता शाहिद कपूर हा चर्चेत आहे तो त्याच्या लग्नाविषयीच्या बातम्यांमुळे... शाहिद लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात जज म्हणून दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिदची गर्लफ्रेंड मीरा हीची शाहिदसोबत पहिली सार्वजनिक 'झलक'ही याच कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Updated: Jul 1, 2015, 03:18 PM IST
लवकरच दिसणार शाहिदच्या मीराची 'झलक'! title=

मुंबई : सध्या अभिनेता शाहिद कपूर हा चर्चेत आहे तो त्याच्या लग्नाविषयीच्या बातम्यांमुळे... शाहिद लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात जज म्हणून दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिदची गर्लफ्रेंड मीरा हीची शाहिदसोबत पहिली सार्वजनिक 'झलक'ही याच कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

शाहिद आणि मीराचं हे लग्न हे आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. लग्न पत्रिकाही छापल्या गेल्यात. मीडियापासून चार हात दूरच राहणाऱ्या मीराला पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. 

दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मीरासोबत शाहिदचा 'रोका' मकरसंक्रांतीला झाला होता. यानंतर जुलैमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत मुंबईत मीरा-शाहीद यांच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शनही आयोजित करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.