'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांसाठी खुशखबर...

मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती प्रोड्युसरसोबत झालेल्या वादमुळे... यानंतर तिच्यावर 'सिने अॅन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (CHINTAA) लाईफटाईम बॅन टाकणार असल्याचं म्हटलं जातं होतं... पण, आता मात्र 'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांना दिलासा मिळालाय. 

Updated: Apr 15, 2016, 03:20 PM IST
'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांसाठी खुशखबर...

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती प्रोड्युसरसोबत झालेल्या वादमुळे... यानंतर तिच्यावर 'सिने अॅन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (CHINTAA) लाईफटाईम बॅन टाकणार असल्याचं म्हटलं जातं होतं... पण, आता मात्र 'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांना दिलासा मिळालाय. 

कारण, CHINTAA कडे एखाद्या अभिनेता / अभिनेत्रीवर बंदी घालण्याचा असा कोणताही अधिकार नसल्याचं या संस्थेचे मानद सचिव सुशांत सिंह यांनी म्हटलंय. 

एका इंग्रजी वर्तमानपत्रानं, CHINTAA नं शिल्पा शिंदेविरुद्ध नॉन - कोऑपरेशन ऑर्डर जारी करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. यानंतर कोणताही प्रोड्युसर तिच्यासोबत काम करू शकणार नाही, अशी ही तरतूद असल्याचं यात म्हटलं होतं. 

त्यामुळे, 'अंगुरी भाभी' आता लवकरच 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसेल, अशी आशा आहे.