'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू

'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.

Updated: Oct 8, 2015, 11:36 AM IST
'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू title=

मुंबई: 'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.

आणखी वाचा - शाहरूख-काजोल पडद्यावर पुन्हा एकत्र, अजय देवगन म्हणाला...

काजोल-शाहरुखची जोडी आपला जलवा दाखविण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालीय. काही दिवसांपासून हैदराबादला चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच लोकं चित्रपटाबाबत खूप उत्साहिती आहेत.

शाहरूखनं 'दिलवाले'चा हा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. शाहरूखनं लिहिलं, 'फिल्म जी कमाल करेल ते रोहित करले, पण त्यानं जो फोटो घेतलाय, तो पाहा.'

यापूर्वी शाहरूखनं एक ट्विट केलं होतं, त्यात तो म्हणाला 'खूप उशिरापर्यंत शूटिंग केल्यानं थकलोय. पण मज्जा आली. काजोल खूप सुंदर, वरूण डॅशिंग आणि कृति सेनन सुंदर दिसत होती. मी तर माझ्या सारखाच दिसत होतो.'

पाच वर्षांनंतर शाहरूख-काजोल एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी 'माय नेम इज खान'मध्ये काम केलं. रोहित शेट्टीचा 'दिलवाले' येत्या १८ डिसेंबरला रिलीज होतोय. यात वरुण धवन, कृति सेनन, बोमन इराणी आणि विनोद खन्ना सुद्धा प्रमुख भूमिकांमध्ये आहे. 

आणखी वाचा - शाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.