अहमदाबाद : सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सिनेमात हिंदू देव देवतांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय.
सिनेमातील अपशब्द असलेल्या प्रोमोंना परवानगी दिलीच कशी, असा सवाल करत अहमदाबाद हाय-कोर्टानेही सेन्सॉर बोर्डाकडे ३० जूनपर्यंत स्पष्टीकरण मागितलंय.
मोहल्ला अस्सी या आगामी सिनेमात हिंदु देवतांचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेता सनी देओलचा हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात सापडलाय.
अभिनेता सनी देओल आणि 'मोहल्ला अस्सी' या सिनेमाच्या विरोधात वाराणसीतनंतर पंजाबमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हिंदु धर्मियांच्या भावना दुखवल्याबद्दल याचबरोबर सिनेमात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी अभिनेता सनी देओलसोबतच सिनेमाचे दिग्दर्शक चंद्र प्रकाश त्रिवेदी, निर्माता विनय त्रिवेदी, लेखक काशीनाथ सिंग यांच्याबरोबरच सिनेमातल्या अनेक सहकलाकारांच्या नावांचा समावेशही या एफआय़आऱमध्ये करण्यात आलाय.
गंगेच्या घाटावर कशाप्रकारे लोकांच्या धार्मीक भावनांचा गैरवापर केला जातो अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा प्रोमोही लिक झाला होता.. तेव्हापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.