सनी लियोनीची नवी इनिंग

पॉर्न फिल्मस, रियॅलिटी शो आणि बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर सनी लियोनी आता चित्रपट प्रॉड्यूस करणार आहे.

Updated: Apr 10, 2016, 07:55 PM IST
सनी लियोनीची नवी इनिंग

मुंबई: पॉर्न फिल्मस, रियॅलिटी शो आणि बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर सनी लियोनी आता चित्रपट प्रॉड्यूस करणार आहे. या चित्रपटामध्ये ती स्वत: काम करणार आहे. 

जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, हा चित्रपट ड्रामा थ्रिलर असेल असं सनी लियोनीनं सांगितलं आहे. सुपर हिरोवर आधारित एक चित्रपट करायचा आहे, त्याबाबतच्या चर्चाही सुरु आहेत, पण हा चित्रपट झाल्यावर त्याच्या कामाला सुरुवात करीन असंही ती म्हणाली आहे. 

चित्रपटाची स्क्रीप्ट लिहायला मात्र सनीनं नकार दिला आहे. चित्रपटाची स्क्रीप्ट लिहायला वेगळं कौशल्य लागतं, जे माझ्यात नाही अशी कबुली सनीनं दिली आहे.