मुंबई : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमाने मराठीत इतिहास नोंदवलाय. या सिनेमा अफाट यश मिळालेय. कमाईत ८५ कोटींचा टप्पा पार केलाय. सध्या या सिनेमाची टीम सक्सेस पार्टीत मग्न आहे. तर ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरु नुकतीच आपल्या गावी अकलूजला गेली. तिथे तिचे जंगी स्वागत झाले.
रिंकूचे थाटात स्वागत झाल्यानंतर तिच्या मित्रमंडळींनी मेजवानीचा खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे थोडावेळ थांबल्यानंतर ती थेट आपल्या घरी पोहोचली. कारण तिला आपल्या आईच्या हातची पुरणपोळी आणि वांग्याची भाजी खायची होती. तिला आपल्या आईच्या हातचे जेवण खूप आवडते. त्यामुळे तिने घरची वाट धरल्याचे एका मुलाखतीत रिंकूने एका इंग्रजी वतर्मानपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पट केलेय.
रिंकू सांगते, मी फक्त माझ्या दहावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी पुस्तक विकत घेण्याचे काम करणार आहे. माझ्यासाठी माझे काम आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.