८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन

 ८० लाखांच्या रोकड प्रकरणात अमळनेरचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना अटक  करण्यात आली आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून अमळनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौधरी यांना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Updated: Oct 14, 2014, 05:23 PM IST
८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन title=

अमळनेर :  जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये ८० लाखांची रोकड सापडल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांची जामीनावर सुटका करण्यात आलीय.

११ ऑक्टोबरला धुळ्यातल्या एका लॉजमध्ये ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्याशी संबधित असल्याचं उघड झालं होतं.

चौधरी उमेदवारी अर्ज भरताना यातला एक आरोपी त्यांच्यासोबत उपस्थित होता. त्यामुळं चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. 

चौधरी यांना या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून अमळनेर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने चौधरी यांना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.