छगन भुजबळांचा राजकीय प्रवास

येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Updated: Oct 2, 2014, 04:33 PM IST
छगन भुजबळांचा राजकीय प्रवास title=

नाशिक : येवला मतदारसंघात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात सरळ लढत होत असून, पवारांनी भुजबळांसमोर तगडे आव्हान उभे केल्याने त्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

नाशिकमधून छगन भुजबळ यांनी लोकसभा लढवली मात्र यात त्यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिक जिल्ह्यात झाला. मुंबईतील 

व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका  घेतली. 

सुरूवातीला भुजबऴ  शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.शिवसेनेतून राजकारणाला सुरूवात

भुजबळ हे १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. यानंतर १९७३ ते 1984 दरम्यान महापालिकेत विरोधी पक्षनेते होते, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.

शिवसेना सोडली
१९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने  त्यांनी याचवर्षी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

शिवसैनिकांचा हल्ला
जेव्हा गिरणगावात केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा आणि शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम 

असायचा अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारले. पक्षात बंडाळी केल्याने शिवसैनिक संतापले आणि त्यांनी छगन भुजबळांवर हल्ला देखिल केला होता. यात भुजबळ बचावले होते.

बाळा नांदगांवकरांनी आस्मान दाखवलं
आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसप्रवेश केला, सत्ताधारी बनले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या भुजबळांच्या विरोधात बाळा नांदगावकर नावाच्या नवख्या तरुण शिवसैनिकाला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि या तरुणाने भुजबळांना चारीमुंड्या चीत करत ‘जाएंट किलर’  अशी उपाधी मिळवली.

सुरूवातीला काँग्रेस आणि पवारांसोबत राष्ट्रवादीत
सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा 

निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले.

भुजबळ हे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. १९८५ आणि १९९० अशा दोन वेळा 

मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण 

आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी 

पक्षनेते.

1999 मध्ये भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. भुजबळांना एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.

नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. यानंतर आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.

भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.

मुंबईतील पराभवानंतर नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र निवडलं
मुंबईसारख्या शहरात दोन वेळा महापौर राहिलेल्या छगन भुजबळांनी शिवसेनेस प्रथम विधानसभेत माझगावमधून प्रवेश मिळवून दिला. त्या भुजबळांना मुंबईतून बाहेर जावे लागले. त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळात मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि येवल्याचे प्रतिनिधीत्व स्वीकारले. 

येवला ही पूर्वीपासून नगरपालिका. येवले शहरात यापूर्वी राजकीयदृष्ट्या जनसंघ भाजपा होता. ती जागा मधल्या दरम्यान शिवसेनेने घेतली. येवल्याहून (त्यावेळी निफाड मतदार संघ) शिवसेनेचे आमदार १९८९, १९९५ मध्ये निवडून येत होतं. परंतु आता ही जागा राष्ट्रवादीने घेतली आहे. छगन भुजबळांचा ‘गड’ म्हणजे माझगाव. परंतु मुंबईत भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा १९९१ मध्ये पहिला पराभव एका शिवसैनिकाने केला. 

त्यानंतर दुसर्‍यांदा भुजबळांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांना हार पत्करावी लागली, ते राष्ट्रवादीत मागील दरवाज्यांनी विधान परिषदेत गेले. 

तेथे विरोधी पक्षनेतेही झाले. परंतु त्यांना खंत होती ती आपण मागील दरवाज्यानं आलो त्याची! त्यासाठी ते मतदारसंघ शोधीत होते. त्यातून भुजबळांच्या पुढे ‘येवल्याचे’ नाव पुढे आले. 

‘समता परिषदेचे’ काम सुरू
भुजबळ हे माळी समाजाचे ओबीसी नेते. त्या काळात ‘समता परिषदेचे’ काम सुरू झाले आणि येवलेा, निफाड, लासलगाव आदी भागांतून मोठे कार्यकर्ते पुढे आले, त्यातून विधानसभेसाठी ‘येवला’ हा मतदारसंघ निवडला आणि त्यांनी आपले कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा हे केले. 

ते स्वतः येवल्यातून विधानसभेवर, चिरंजीव पंकज भुजबळ नांदगावमधून तर पुतणे समीर भुजबळ हे नाशिकमधून लोकसभेवर निवडून गेले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.