'दिविजा'नं मोडला शरद पवारांच्या कन्येचा रेकॉर्ड!

भाजप नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातीत घेऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. ४४ वर्षीय फडणवीस महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 30, 2014, 07:51 AM IST
'दिविजा'नं मोडला शरद पवारांच्या कन्येचा रेकॉर्ड! title=

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातीत घेऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. ४४ वर्षीय फडणवीस महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस दुसऱ्या नंबरवर आहेत. स्वत: फडणवीस यांनी शरद पवार यांचा हा रेकॉर्ड तोडला नसला तरी त्यांची कन्या दिविजा हिनं मात्र शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा रेकॉर्ड तोडलाय.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस लवकरच मुंबईस्थित मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जातील. त्यांची मुलगी दिविजा ही सध्या पाच वर्षांची आहेत. त्यामुळे, विदिशा ही मुख्यमंत्री निवासस्थानी म्हणजेच 'वर्षा' बंगल्यावर राहायला जाणारी मुख्यमंत्र्यांची सर्वात कमी वयाची मुलगी ठरणार आहे.

१९७८ साली जेव्हा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांचं वय होतं अवघं ३८ वर्ष... तर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या तेव्हा नऊ वर्षांच्या होत्या. 

पाच वर्षांच्या दिविजाला वडिलांच्या पक्षाचं नाव माहीत आहेच पण, ती आरशासमोर उभी राहून त्यांच्यासारखं भाषणंही देते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.