नंदुरबार : मुंबईचं खच्चीकरण करून अहमदाबादचं महत्व वाढवण्याचं नरेंद्र मोदींनी डोक्यात घेतलंय, अशी सणसणीत टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी सरकार केंद्रात येताच पहिल्याच महिन्यात महाराष्ट्राचं पालघरचं सागरी सुरक्षा पोलिस कार्यालय गुजरातमध्ये हलवलं, तेव्हा महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री दिल्लीत कॅबिनेटच्या बैठकीत मूग गिळून गप्प बसले होते.
मुंबईचं आरबीआयचं कार्यालय मुंबई बाहेर हलवण्याचा विचार त्यांचा आहे, मुंबईच खच्चीकरण करून अहमदाबादचं महत्व वाढवलं जातंय, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
आधी परदेशातील परदेशातील महत्वाच्या व्यक्ती पाहुणे दिल्लीत नाहीतर मुंबईत सर्वात आधी यायचे आता ते अहमदाबादेत येतात, अहमदाबादचं महत्व वाढवून मुंबईचं महत्व कमी करण्याचं नरेंद्र मोदींच्या डोक्यात आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, मी अनेक चांगलं वाईट अनुभवलंय, हे महाराष्ट्राच्या दौऱ्यात उघड करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.