मुंबई : सुभाष देसाई यांनी ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतिसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला.
१९ जून १९६६ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांनी प्रचंड मोठी आघाडी उभारली होती. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर भव्य मेळावा भरला. शिवसेनाप्रमुखांच्या मुंबईभर घणाघाती भाषणे, विराट सभा, भाषणे होत होती. मुंबईतील मराठी माणसच्या भावनेलाच त्यांनी स्पर्श केला होता. शिवसेनाप्रमुखांचे प्रांजळ विचार, मराठी माणसांविषयीची आत्मीयता, भाषणातील आक्रमकता या साऱ्यांनी तरुण भारावले गेले. मराठी माणसांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळू लागलं. उद्योग व्यवसायात मराठी तरुण दिसू लागले.
लक्षावधी तरुणांप्रमाणेच सुभाष देसाई देखील बाळासाहेब ठाकरे या वादळाकडे ओढले गेले. वैयक्तिक उद्देशापेक्षा त्यांनी शिवसेनेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलं.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाने, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९७२ साली सुभाष देसाई यांनी ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेची स्थापना केली, आणि गोरेगावची एका वेगळ्या विश्वाकडे वाटचाल सुरु झाली.
राजकीय कारकीर्द -
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक.
महाड येथील १९८५ मधील शिवसेनेच्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख संयोजक.
ता. खेड, जिल्हा रत्नागिरी येथे कोकण रेल्वे परिषदेचे यशस्वी आयोजन.
’बॉम्बे’ आणि ’बंबई’ चे मुंबई नामकरण करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभाग.
वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी झाल्याने अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले.
पक्षाचा प्रचार आणि पक्षाच्या निवडणूक मोहिमांचे यशस्वी आयोजन.
जळगाव - रत्नागिरी - ठाणे आदि जिल्ह्यांचे संपर्कनेते पदाची जबाबदारी
शिवसेना
शिवसेना नेते
शिवसेना प्रवक्ते
शिवसेना सरचिटणीस
आमदार
गोरेगाव विधानसभा मतदार संघ (१९९०, २००४)
विश्वस्त
प्रबोधन प्रकाशन
(प्रकाशित पुस्तके : शिवसेना काल – आज – उद्या, आपले गोरेगाव, शतपैलु सावरकर, समर्थ रामदास, समर्थ संस्कार, वक्ताआ दशसहस्त्रेषु, एकांकिका उत्सव)
प्रकाशक
दैनिक सामना
दोपहर का सामना
मार्मिक
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.