ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गोरेगाव

आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे. 

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

मुंबई : आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - सुभाष देसाई
भाजप - विद्या ठाकूर
काँग्रेस - गणेश कांबळे
राष्ट्रवादी - शशांक राव
मनसे - शरद सावंत

या मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख ३३ हजार आहेत. मतदारसंघाचा विचार करता मराठी मतदारांचे प्राबल्य स्पष्टपणे जाणवते.

महापालिकेचा विचार करता एकूण सात नगरसेवका मध्ये पाच वसेनेचे नगरसेवक आहेत तर दोन नगरसेवक काँग्रेसचे आहेत.
 
गोरेगावमध्ये शिवसेनेनं गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या मेळाव्याचे आयोजन करुन त्याचा पर्यायानं फरक हा मतदारसंघावर पडलाय.

२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मनसे आणि राष्ट्रवादीचे आव्हान असतानाही निर्विवाद विजय साकारला होता. 

या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी  ६९,११७ एवढी मतं मिळवली होती. तर  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद राव यांना ४४,३०२ एवढी मत मिळाली होती. या निवडणुकीत सुभाष देसाई यांनी २४,८१५ एवढ मताधिक्य मिळवलं होतं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे कीर्तीकर यांना गोरेगाव विधानसभा मतदारसंघात ४५ हजार मतांची आघाडी मिळाली. 

मतदारसंघावरील शिवसेनेचा प्रभाव, देसाई यांची पक्षनेतृत्वाशी असलेली जवळीक यामुळे आगामी निवडणुकीतही देसाई यांचा मार्ग सोपा आहे.
 
सुभाष देसाई यांनी विकासकामाचा धडाका लावल्याचा दावा केलाय.

आमदारांनी केलेली कामे

 - बेरोजगार महिला - तरुणांना विकासकामाच्या संधी
- शौचालय बांधकामाला अग्रक्रम
- कलावंतासाठी अनेक सांस्कृतिक  कार्यक्रमाना चालना 
- आरोग्यविषयक सुविधा, आणि जेनरिक औषधं उपलब्ध
- विभागात अंतर्गत रस्ते बनवले.  
- वृद्ध आणि मुलांसाठी विभागातील उद्यानांचे सुशोभीकरण केले 
- विभागातील स्थानिक समस्येसाठी शासनाकडे पाठपुरावा

कामगार नेते म्हणून ओळखले जाणारे शरद राव यांनी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून त्यांचा मुलगा शशांक राव भाजपच्या तिकीटावर उभे राहिलेत. 

मतदारसंघातील समस्यांचा विचार करता, एसव्हीरोडवर आणि लिंक रोड वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे .  
रेल्वे प्रवाशाची समस्या गंभीर आहे, विभागातील रस्ते रुंदीकारणाची समस्या सोडवलेली नाही, झोपडपट्टीच्या विकासाला प्राधान्य दिले नाही अशा प्रतिक्रिया मतदारांनी गेल्या पाच वर्षाच्या कारभारावर दिल्यात.

शरद राव यांचा 1990, 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत देसाई यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. पण त्यामुळे नव्या दमाचे शशांक राव यांचा देसाई यांच्यासमोर कितपत निभाव लागेल, हे पाहणे रंजक ठरेल. सत्तरी ओलांडलेले देसाई आणि ४३ वर्षीय शशांक राव यांचा सामना रंगणार असेच सध्या तरी चित्र आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.