माळीण दुर्घटनेतील मृतांची आज सामूहिक दशक्रिया विधी

डोंगरकडा कोसळून उद्धवस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांची सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडली. 30 जूलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

Updated: Aug 10, 2014, 03:09 PM IST
माळीण दुर्घटनेतील मृतांची आज सामूहिक दशक्रिया विधी title=

माळीण, पुणे: डोंगरकडा कोसळून उद्धवस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांची सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडली. 30 जूलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

या सर्व मृतांवर आज सामूहिक दशक्रिया विधी करण्यात आली. दरम्यान माळीण गावच्या पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, विधानसभा अध्यक्ष दिलीप-वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित राहणार आहेत.

या दुर्घटनेनंतर बरेच दिवस बाचवकार्य सुरु होतं. या बचावकार्यात पहिल्या दोन दिवसात काही जणांना जीवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश मिळालं होतं. यात 2 महिन्यांच्या बालकाचाही समावेश होता. पण माळीणगावचे इतर लोक इतके भाग्यवान नव्हते. या भुस्खलनात तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज माळीण गावात फक्त मातीचे ढिगारे आणि गावाची आठवण करुन देणारे घरांचे शाळेचे अवशेष उरले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.