यवतमाळमध्ये वीज पडून 3 युवकांचा मृत्यू

जिल्ह्यात शेतात वीज पडून 3 युवकांचा मृत्यू झालाय. नितीन बहादूरे, कृष्णा गायकवाड आणि मारोती हापसे अशी त्यांची नावं आहेत. उमरखेडच्या टाकळी शिवारात ही घटना घडलीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे. 

Updated: May 11, 2016, 04:54 PM IST
यवतमाळमध्ये वीज पडून 3 युवकांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात शेतात वीज पडून 3 युवकांचा मृत्यू झालाय. नितीन बहादूरे, कृष्णा गायकवाड आणि मारोती हापसे अशी त्यांची नावं आहेत. उमरखेडच्या टाकळी शिवारात ही घटना घडलीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे. 

काल दुपारी शेत मशागतीची कामे सुरु असताना लाकडं गोळा करण्यासाठी हे तिघं गेले होते. त्याच वेळी अचानक आकाश भरून आलं आणि पाऊस सुरू झाला. तिघांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. मात्र नेमकी या झाडावर वीज कोसळून यात तिघांचा अंत झाला. बराच वेळ होऊनही तिघं घरी परतले नसल्यामुळे घरच्यांनी शोध घेतल्यावर झाला प्रकार लक्षात आला.