नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. जर घोटाळा झाल्याचा निष्कर्ष पणन संचालकांनी काढला होता तर मग मंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती देण्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
पणन संचालकांचा आदेश राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धुडकावून लावत बरखास्तीला स्थगिती दिलीय.एपीएमसीच्या FSIचा घोटाळा करुन 138.10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप संचालक मंडळावर ठेवण्यात आलाय. त्यामुळं राज्याचे जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले होते. तसंच सर्वांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही आदेश संचालकांनी दिले होते. जर घोटाळा झाल्याचा निष्कर्ष पणन संचालकांनी काढला होता तर मग मंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती देण्यामागचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
यावर आता विरोधकांनीही रान उठवायला सुरूवात केलीय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सर्व संचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून शशिकांत शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीय. आघाडी सरकार घोटाळेबाजांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही तावडेंनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.