औरंगाबाद : येथील घाटी रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली. अत्यवस्थ नवजात शिशू दगावल्यामुळे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
यात रुग्णाचे नातेवाईक आणि काही डॉक्टर्सही जखमी झालेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे निवासी अधिष्ठाता आणि अधिक्षकांच्या समक्षच ही हाणामारी झाली.
दरम्यान या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलंय. त्यामुळे रुग्णसेवेवर ताण पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.