अहमदनगर : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी युती झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याचा निषेध करण्यात सुरुवात केली आहे. भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन केले.
राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यान अहमदनगर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी आत्मक्लेष आंदोलन केले. श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधीच्या पुतळयाजवळ आज सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात ज्येष्ठ आणि तरुण निष्ठावंत यांनी सहभाग घेतलाय. विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनतेला जनतेने नाकारले. जनतेने भाजपला कौल दिलाय. त्यामुळे सत्तेसाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा कशाला घेतला, असा सवाल आता भाजपचेच कार्यकर्ते विचारीत आहेत.
प्रचारात भाजपने काँग्रेसविरोधात प्रचार केला आणि भ्रष्टवादी असा राष्ट्रवादीचा उल्लेख केला. आता सत्तेसाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी छुपी युती केली आहे. त्यामुळे जनसामन्यांत एक वेगळा मेसेज गेलाय. स्वपक्षाचा निषेध करता येत नसल्याने या कार्यकर्त्यानी आत्मक्लेश केलाय. या आंदोलनात भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. याचे नेतृत्व ज्येष्ठ नेते हेरंब औटी, कार्यकर्ते सुनील मुथा यांनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.