ओरोस : भाजपप्रवेशाच्या जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे सिंधुदुर्गात आहेत. राणे आज त्यांच्या मेडिकल कॉलेज संदर्भात व्यस्त असल्याचे दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काही कार्यकर्ते राणेंच्या काय संदेशाची वाट बघताय. काल सिंधुदुर्गात आल्यावर थेट निवासस्थानी नं जाता राणे मेडिकल कालेजकडे गेले. तिथून रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी परतले. जिल्ह्यातील कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्याची भेट घेतली नाही.
आज सकाळी पुन्हा मेडिकल कॉलेजकडे गेले. नारायण राणेंचा अहमदाबाद दौरा वैयक्तिक कामासाठी होता का? याबाबतही जिल्ह्यात उत्सुकता वाढलेली आहे. या परिस्थतीमुळे जिल्यातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.