नाशिक : नाशिकमध्ये कृषी मालाच्या व्यवहारातून आणि पूजा विधीतून दररोज काळा पैसा पांढरा केला जातोय. कृषी मालासाठी शेतक-यांना पाचशे आणि हजाराच्या चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या जात आहेत. या माध्यमातून दररोज पंचवीस कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जातोय. इतकंच नाही, तर धार्मिक पूजा विधीतूनही दररोज मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची निर्मिती होतेय.
झी मीडियानं गेल्या आठवड्यात पुराव्यासह हा काळा धंदा समोर आणला होता. नुकत्याच टाकण्यात आलेल्या आयकर विभागाच्या छाप्यातदेखील ही बाब उघड झाली आहे. आयकर विभागानं सर्व व्यापा-यांच्या व्यवहारावर करडी नजर ठेवायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी नाशिकच्या तीन व्यक्तींना रंगेहाथ पकडण्यात आलंय. त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून आपल्या संपत्तीचं विवरण द्यायला सांगण्यात आलं आहे.