८५ टक्के मिळाले, पण सायंकाळी शॉ़क लागून तो 'गेला'

लाईटचा शॉक लागून मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील संकेत गणपत पाटील (वय 16) या मुलाचा सोमवारी (दि 8 जून) सायंकाळी घरात लाईटचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

Updated: Jun 9, 2015, 01:44 PM IST
८५ टक्के मिळाले, पण सायंकाळी शॉ़क लागून तो 'गेला' title=

भिवंडी : लाईटचा शॉक लागून मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील संकेत गणपत पाटील (वय 16) या मुलाचा सोमवारी (दि 8 जून) सायंकाळी घरात लाईटचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

विशेष म्हणजे सदर मुलाचा आज दहावीचा निकाल लागला असून तो 85% गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. मात्र त्याच्यावर आज काळाने अचानक घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.