पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव येथे मुळा नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे .1972 पासून या पुलावरून वाहतुक सुरु असून सध्या पुलाला भगदाड पडल्याने एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांना जोडणार हा मार्ग आणि याच मार्गावरील असलेल्या घारगाव या गावातून वाहणारी मूळा नदी वरील पुलाला भगदाड पडले आहे.
नाशिक,सिन्नर, संगमनेर ,शिर्डी या ठिकाणाकडून पुण्याला जाण्याचा हा महत्वाचा मार्ग आहे. या शिवाय हा पुल १९७२ चा असून ही या पुलाची दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक खात्याने वेळोवेळी या पुलाकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.