पुणे : शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांचा मुलगा आणि नगरसेवक सनी निम्हण याला अटक करण्यात आली आहे. पाषाणमधील रस्त्याच्या वादावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
निम्हण यांनी हा रस्ता अडवल्याचा आरोप इथल्या प्लॉट धारकांनी केलाय. रस्त्याच्या वादातून नगरसेवक सनी निम्हण आणि प्लॉटधारक यांच्यात हाणामारी झाली होती. त्यानुसार चतुश्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याता आला होता.