नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये पक्षात घेवून पवित्र केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आगामी नाशिक पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पवन पवारला पक्षात घेतल्याची चर्चा असताना अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवन पवार याच्यावर पोलीस कृष्णकांत बिडवे यांच्या हत्याकांडप्रकरणी आरोप आहेत. तो प्रमुख आरोपी आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना भाजपने त्याला पक्षात सामावून घेतले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना जबर बसविण्यासाठी पवारला पक्षात घेतल गेल्याची जोरदार चर्चा आहे.