'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Updated: Nov 13, 2016, 05:54 PM IST
'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा' title=

मुंबई : रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

खासगी रुग्णालयांनी हा आदेश धुडकावल्यास 108 या सरकारी हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. रुग्णालयाला चेक देताना संबंधित व्यक्तीचा फोन किंवा मोबाईल नंबर लिहून घेण्याची सूनचाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान खासगी रुग्णालयाला दिलेला चेक बाऊन्स झाल्यास संबंधित रुग्णालयाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे.